Marathi

मूळव्याध (पाइल्स) आणि फिशरच्या त्वरित उपचारांसाठी पायलोस्प्रे (PiloSpray) आणि पायलोकिट (PiloKit)

Buy From:

पायलोस्प्रे - मूळव्याध किंवा पाइल्स आणि फिशर करिता जगातील प्रथम टच-फ्री स्प्रे उपचार पद्धती

पाइल्स सारख्या गंभीर समस्येसोबत जीवन जगणे खूप अवघड आहे आणि त्यावर उपचार करणे त्यापेक्षाही अधिक कठीण आहे. जेव्हा आपल्याला बसताना देखील भीती वाटते, तेव्हा आपण स्पर्श करुन उपचारांची कल्पना कशी करू शकता?

क्रिम/मलम/जेल सारख्या पारंपारिक उपचार पद्धती ह्या ऍप्लिकेटर वापरुन केल्या जातात. ऍप्लिकेटरचा वापर केल्याने दुखापत, वेदना आणि गैरसोय होऊ शकते. क्रिम/ मलम/ जेल सोबत इतर बर्‍याच समस्या आहेत: प्रभावित गुदद्वार क्षेत्रापर्यंत पोहोचण्यास आणि लावण्यात अडचण, त्वरित उपयोग शक्य होत नाही, आणि आराम मिळण्यास वेळ लागतो.

या सर्व समस्यांवर उपाय आहे पायलोस्प्रे!

पाइलोस्प्रे पाइल्स आणि फिशर साठी एक आधुनिक, टच-फ्री स्प्रे उपचार पद्धती आहे. पायलोस्प्रे वापरायला सोपे आहे. त्रासातून त्वरित आराम मिळण्यासाठी हे कधीही आणि कुठेही वापरले जाऊ शकते.

पायलोस्प्रे मुळे पेशन्टस ना खूप फायदा होईल. कारण स्वतःहुन उपचार करणे सोपे झाले आहे, वेळेवर उपचार करणे आता शक्य आहे, आणि वेदना, जळजळ, खाज सुटणे, रक्तस्त्राव आणि सूज यांसारख्या लक्षणांपासून लगेच आराम मिळणे फक्त एक स्प्रे भर दूर आहे.

पायलोस्प्रे मध्ये पाइल्स आणि फिशर च्या उपचारांसाठी तिळ तेल, दारुहळद, लोध्र, मोचरस, कापूर, पुदिना आणि कोकम तेल अशा 7 निवडक आयुर्वेदिक औषधींचा वापर केला आहे.

पायलोस्प्रे मध्ये ऍन्टि - हेमोरेजिक, हीमोस्टॅटिक, ऍन्टिसेप्टिक, ऍनाल्जेसिक, ऍनेस्थेटिक, ऍन्टि - प्रुरायटिक, ऍन्टि-इंफ्लेमेटरी आणि जखमेवर उपचार करणारे गुणधर्म आहेत. या मुळे उपचार प्रक्रियेला चालना मिळते आणि पाइल्स आणि फिशर च्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळतो.

पायलोस्प्रे हे क्लीनिकली रिसर्चड, 100% सुरक्षित आणि नैसर्गिक, आयुर्वेदिक औषध आहे.

पायलोस्प्रे हे ‘ हीलिंग हॅन्डस अँड हर्ब्स ' यांनी ' हीलिंग हॅन्डस क्लीनिक ' या भारतातील सर्वात मोठ्या पाइल्स हॉस्पिटल चेनच्या सहकार्याने विकसित केले आहे.

पायलोस्प्रे ला कसे वापरावे?

पायलोस्प्रेला वापरण्यापूर्वी नीट हलवावे. ते 5 ते 8 cm च्या अंतरावरून 2 ते 4 sec साठी प्रभावित गुदद्वार क्षेत्रात स्प्रे करावे. पायलोस्प्रे चा वापर पोट साफ करण्यापूर्वी आणि नंतर, आणि रात्री झोपण्यापूर्वी, किंवा लक्षणांच्या तीव्रतेनुसार आवश्यक तितक्या वेळा केला पाहिजे.

पायलोस्प्रे वापरण्याकरिता पोझिशन्स

1. दोन पायांवर बसून

  • आरामदायक स्थितीत दोन पायांवर बसा
  • एका हाताने नितंब ना पसरवा
  • गुदद्वाराच्या प्रभावित भागावर बाहेरून स्प्रे करा

2. उभे राहून

  • एका पायावर आरामात उभे रहा आणि दुसरा पाय योग्य आधारावर उचलून ठेवा
  • एका हाताने नितंब ना पसरवा
  • गुदद्वाराच्या प्रभावित भागावर बाहेरून स्प्रे करा

3. झोपून

  • एका बाजूला झोपा आणि एक पाय पोटाजवळ उचलून घ्या
  • एका हाताने नितंब ना पसरवा
  • गुदद्वाराच्या प्रभावित भागावर बाहेरून स्प्रे करा

पायलोकिट - मूळव्याध किंवा पाइल्स आणि फिशर च्या ऍडवान्सड ट्रीटमेंट साठी पायलोकिट

पायलोकिट हे अशा पेशन्टस साठी आहे ज्यांना पाइल्स आणि फिशर च्या ऍडवान्सड स्टेजेस साठी अतिरिक्त उपचारांची गरज असते. पायलोकिट ऍडवान्सड पाइल्स, इंटर्नल आणि एक्सटर्नल पाइल्स, ब्लीडिंग पाइल्स, आणि ऍक्युट फिशर साठी सूचित केले जाते.

पायलोकिट पाइल्स आणि फिशर साठी 100% सुरक्षित, आयुर्वेदिक औषधांची संयुक्त उपचार पद्धती आहे.

पायलोकिट (PiloKit) मध्ये आधुनिक स्प्रे पायलोस्प्रे (PiloSpray) आणि टॅब्लेट्स - पायलोटॅब (PiloTab) आणि कॉंन्स्टीटॅब (ConstiTab) यांचा समावेश आहे.

पायलोटॅब आणि कॉंन्स्टीटॅब सुद्धा पायलोस्प्रे प्रमाणेच क्लीनिकली रिसर्चड आयुर्वेदिक औषधे आहेत.

पायलोटॅब (PiloTab)

पायलोटॅब टॅब्लेट मध्ये पाइल्स आणि फिशर च्या उपचारांसाठी 4 निवडक आयुर्वेदिक औषधी दुग्धिका, दारुहळद, नागकेसर आणि लाजाळू यांचा वापर केला आहे.

पायलोटॅब टॅब्लेट मध्ये ऍन्टि - हेमोरेजिक, हीमोस्टॅटिक, ऍन्टिसेप्टिक, ऍनाल्जेसिक, ऍन्टि-इंफ्लेमेटरी आणि जखमेवर उपचार करणारे गुणधर्म आहेत.

हे वेदना, रक्तस्त्राव आणि सूज यासारख्या पाइल्स आणि फिशर च्या लक्षणांपासून त्वरित आराम प्रदान करतात आणि यामुळे अंतर्गत उपचार प्रक्रियेला चालना मिऴते.

कॉंन्स्टीटॅब (ConstiTab)

कॉंन्स्टीटॅब टॅब्लेट मध्ये पाइल्स आणि फिशर संबंधित बद्धकोष्ठतेच्या उपचारांसाठी 6 निवडक आयुर्वेदिक औषधी सोनामुखी, हिरडा, बालहिरडा, निशोत्तर, सैंधव आणि एरंड तेल यांचा वापर केला आहे.

हे पचनास मदत करते, मल प्रवाह नियमित करते आणि बद्धकोष्ठतेवर आणि त्याच्या ऍसिडिटी आणि गॅस सारख्या लक्षणांवर देखील कार्य करते.

कॉंन्स्टीटॅब कठोर मल तयार होण्यास रोखते आणि सहजतेने मल निस्सारण सुनिश्चित करते जे पाइल्स आणि फिशर ची लक्षणे कमी करण्यास मदत करते.

पायलोकिट ला कसे वापरावे?

पायलोस्प्रे (PiloSpray)

दिवसातून 2 ते 3 वेळा किंवा लक्षणांच्या तीव्रतेनुसार आवश्यक तितक्या वेळा वापरा.

पायलोटॅब (PiloTab)

नाश्त्यानंतर 1 गोळी आणि रात्री जेवणानंतर 1 गोळी पाण्याबरोबर घ्या.

कॉंन्स्टीटॅब (ConstiTab)

बद्धकोष्ठतेच्या तीव्रतेनुसार रात्री जेवणानंतर 1 किंवा 2 गोळ्या पाण्याबरोबर घ्या.

पाइल्स आणि फिशर साठी पायलोकिट ट्रीटमेंट कोर्स

पायलोकिट ट्रीटमेंट कोर्स 15 दिवसांचा आहे. हा कोर्स 6 वेळा किंवा स्थितीच्या तीव्रतेनुसार 3 महिन्यांसाठी केला जाऊ शकतो.

Buy From:

Mini Cart 0

Your cart is empty.